नेवाश्यात 24 तासात 22 कोरोनाबाधितांची नोंद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे मात्र अजुनही बहुतेक जण विनामास्क फिरत आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

मात्र नागरिकांचा हाच निष्काळजीपणा आता कोरोना वाढीस कारणीभूत ठरत आहे. करोना संक्रमितांच्या संख्येत नेवासा तालुक्यातही वाढ सुरुच असून

नेवासा तालुक्यात 10 गावांतून काल 22 संक्रमितांची भर पडली तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 3176 झाली आहे. बाधितांमध्ये सोनई सर्वात पुढे असून सोनईत काल 5 संक्रमित आढळले तर त्या खालोखाल वडाळा बहिरोबा येथेही 4 संक्रमित आढळून आले.

तालुक्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक 5 संक्रमित सोनईत आढळून आले. वडाळा बहिरोबा व देडगाव येथे प्रत्येकी चौघे बाधित आढळले. घोडेगाव व हंडीनिमगाव येथे प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले.

गेवराई, लांडेवाडी, मुकिंदपूर, शिंगणापूर, टोका या पाच गावांतून प्रत्येकी एक संक्रमित आढळून आला. एकाच दिवसात 22 संक्रमित आढळल्याने तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 3176 झाली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24