ताज्या बातम्या

“शिवसेनेचे 24-25 आमदार नाराज, 14 खासदार भाजपच्या संपर्कात”

Published by
Ahmednagarlive24 Office

मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) काही खासदार (MP) आणि आमदार (MLA) नाराज असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. तसेच शिवसेनेच्या खासदारांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री भेटत नसल्याचे तसेच राष्ट्रवादीकडून त्रास दिला जात असल्याचे सांगितले आहे.

त्यांनतर भाजपकडून आता दावे करण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी शिवसेनेचे खासदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. तसेच शिवसेनेचे आमदार देखील नाराज असल्याचे म्हंटले आहे.

प्रसाद लाड म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या कृपेमुळेच शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत. शिवसेनेच्या (BJP) 18 खासदारांपैकी 14 खासदार आमच्या संपर्कात आहेत.

योग्यवेळी ते आम्ही जाहीर करू, असा गौप्यस्फोट करतानाच शिवसेनेचे 24-25 आमदार नाराज असल्याचा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात म्हणाले की, तळमळतंय, जळमळतंय. मात्र, आता त्यांनाच आपल्या पक्षातील खासदारांची तळमळ, जळजळ दूर करता आली नाही. मात्र, त्याचं चूर्ण आमच्याकडे आहे आणि आम्ही ते योग्यवेळी देऊ असा टोलाही लाड यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

पुढे बोलताना प्रसाद लाड म्हणाले, शिवसेना नेत्यांना पालकमंत्री दाद देत नाहीत. हे आता उघड झालं आहे. त्यामुळे त्यांच्या मनातील मळमळ दिसून येत आहे. असेही ते म्हणाले आहेत.

तसेच राज ठाकरे यांचे कौतुक देखील त्यांनी केले आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं मी स्वागत करतो. बाळासाहेब ठाकरे यांनी भोंगे आणि अजना संदर्भात जी भूमिका जाहीर केली होती.

शिवसेनेची ती भूमिका आता बदलली आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खुद्द जाहीर करणार आहेत का? असेही ते म्हणाले आहेत.

Ahmednagarlive24 Office