ताज्या बातम्या

एसटी कर्मचाऱ्यांना 24 तासांचे अल्टिमेटम…नोकरीवर हजर व्हावे अन्यथा…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. मागणी मान्य न झाल्याने संपकरी अद्यापही कामावर परतले नसल्याने अनेक ठिकाणी लालपरीचे चाक हे रुतलेले आहे.

दरम्यान आता याबाबत प्रशासनाकडून आक्रमक पणा अंगिकारला जात आहे. यामुळे संप अजूनच जास्त चिघळला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एसटी महामंडळाने रोजंदारीवर काम करणाऱ्या 300 ते 350 कामगारांना सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

या कामगारांनी 24 तासांच्या आत नोकरीवर हजर व्हावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता आपली तात्पुरत्या स्वरूपाची नेमणूक रद्द करण्यात येईल असे या नोटिसीत म्हटले आहे.

मंगळवारी सुमारे साडेसात हजार कर्मचारी कामावर हजर झाले. संध्याकाळी सहापर्यंत 66 बसेस राज्याच्या विविध भागात सोडण्यात आल्या असून जवळपास दोन हजार प्रवाशांनी प्रवास केला.

तर महामंडळाने आतापर्यंत एकूण 2 हजार 178 कर्मचाऱयांना निलंबित केले आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण, वेतन आणि इतर मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून एसटी कामगारांनी संप पुकारला आहे.

मंगळवारी एसटी महामंडळाचे 7,623 कर्मचारी ड्युटीवर हजर झाले होते. एसटी महामंडळात रोजंदारी स्वरूपातील दिवस भरला तर पगार, अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणूकीचे सुमारे 1500 कामगार आहेत. त्यांना महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

 

Ahmednagarlive24 Office