अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- राहाता तालुक्यातील चितळी परिसरात राहणार्या 24 वर्षीय तरुणीस विजेचा शॉक बसल्याने तिचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
चितळी येथील अर्चना गणेश वाघ (वय 24) हिला विजेचा धक्का लागल्याने तिला उपचारासाठी श्रीरामपुरात साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र उपचाराआधीच ती मयत असल्याचे साखर कामगार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. साखर कामगार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या
अहवालावरून तालुका पोलिसांत आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोरसे करीत आहेत.