अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे मात्र अजुनही बहुतेक जण विनामास्क फिरत आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
मात्र नागरिकांचा हाच निष्काळजीपणा आता कोरोना वाढीस कारणीभूत ठरत आहे. शनिवारी दिवसभरात श्रीरामपूर तालुक्यात करोनाचे ४५ रुग्ण आढळून आले आहे.
काल पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये खासगी प्रयोगशाळा ४४ तर अँटीजन चाचणी तपासणीत ०३ असे ४७ रुग्ण जणांचा समावेश आहे. करोनाचे उपचार करुन काल २१ रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे.
श्रीरामपूर तालुक्यात गेल्या आठ दिवसात सुमारे २५९ रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे १४६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे १३२ रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
श्रीरामपूर शहरासह तालुक्यात करोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे श्रीरामपूर शहरातील जनतेने करोनाचे सर्व नियम पाळून मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा, सॅनिटायझरचा वापर कायम करा, असे आवाहन करण्यात आले आहे.