अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहेत.समुद्र मार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या 10 जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी ताज हॉटेलमध्ये घुसून नागरिकांवर गोळीबार करत बॉम्ब स्फोट घडवून आणले होते.
या हल्ल्यात 160 जणांना आपला जीव गमावावा लागला तर 300 हून अधिक जण जखमी झाले होते. मुंबईच्या इतिहासातला हा सर्वात भयावह आणि तितकाच क्रूर ठरलेला दहशतवादी हल्ला होता. नेमके या दिवशी काय घडले होते? चला तर मग जाणून घेऊ… दहशतवाद्यांनी शहरात एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले.
या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट झाला. या हल्ल्यातील बरेचसे दहशतवादी हवा भरलेल्या तराफ्यावजा बोटींवरुन समुद्रमार्गे शहरात आले.
या बोटी समुद्रात उभ्या केलेल्या मोठ्या जहाजावरुन सोडण्यात आल्या होत्या. पैकी असेच 26 नोव्हेंबर रोजी रात्री ८च्या दरम्यान एका अशा बोटीतून आठ तरुण कफ परेडच्या मच्छीमार नगरजवळ आले. 8.20 वाजता याच प्रकारे इतर दहा व्यक्ती अशाच बोटींतून कुलाब्यात उतरल्या.
प्रसिद्ध ज्यू गेस्ट हाउसकडे दोन अतिरेकी, दोन अतिरेकी सीएसटीच्या बाजूला, दोन दहशतवादी हॉटेल ताजमहल येथे गेले आणि उर्वरित दोन टीम्स हॉटेल ट्रॉइडेंट ओबेरॉयकडे गेल्या. रात्री 9:20 वाजता हल्ला सुरू झाला.
ए.के. 47 असॉल्ट रायफली घेउन दोन दहशतवादी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या प्रवासी कक्षात घुसले आणि तेथे गोळ्या चालवून त्यांनी हातबॉम्ब फेकले. याच सुमारास इतर दोघांनी ताज होटेलमध्ये सात परदेशी नागरिकांसह 15 जणांना ओलिस घेतले, तर ओबेरॉय ट्रायडेंट होटेलमध्ये इतर काही दहशतवाद्यांनी 40 जणांना ओलिस धरले. 28 ला पहाटे 4:22 ला ताजमहाल हॉटेल पुन्हा पोलिसांच्या आपल्या नियंत्रणात घेतले. यावेळी कमांडोंनी दोन दहशतवाद्यांना ओबेरॉय होटेलमध्ये ठार मारुन इमारतीचा ताबा घेतला.
29 नोव्हेंबर ला दहशतवाद्यांच्या तावडीतील सर्व ओलिसांची सुखरूप सुटका करण्यात आली, यात नऊ दहशतवादी ठार झाले. पैकी जिवंत राहिलेल्या कसाबचा खटला आर्थर रोड तुरुंगात चालवण्याचा निर्णय 16 जानेवारी रोजी घेण्यात आला.
त्यानंतर चालू झालेल्या खटल्याच्या 3 वर्षांनतर, 10 ऑक्टोबर 2011 रोजी सर्वोच्च न्यायालयाने कसाबच्या शिक्षेची अंमलबजावणी रोखली. त्यानंतर राष्ट्रपतींनीदेखील कसाबचा दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर 21 नोव्हेंबर 2012 ला दहशतवादी अजमल अमीर कसाब याला पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली.