चारचाकी वाहनासाठी विवाहीतेला ३ लाखाची मागणी, तिघांवर गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरहून ३ लाख रूपये आणावेत. या मागणीसाठी राहुरी येथील महिलेचा शारीरीक व मानसिक छळ करून तिला घरातून हाकलून दिल्याप्रकरणी शुक्रवार दिनांक २३ जुलै तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशा राजू कांबळे या राहुरी शहरातील मल्हारवाडी रोड परिसरात सातपीर दर्गाजवळ राहत असून नगर तालूक्यातील चिचोंडी पाटील येथील राजू किसन कांबळे याच्या सोबत त्यांचा विवाह झाला होता.

एप्रिल १९९४ पासून ते सन २००७ पर्यंत आशा कांबळे यांनी चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रूपये आणावेत. यासाठी त्यांचे पती, सासू, सासरे यांनी आशा कांबळे यांना वारंवार लाथा बुक्कयांनी मारहाण करून शिवीगाळ केली.

तसेच त्यांना उपाशीपोटी ठेवुन त्यांचा शारिरिक व मानसिक छळ केला. दरम्यान आशा कांबळे यांच्या माहेरच्या लोकांनी दिड लाख रूपये दिले.

मात्र त्यानंतर ते आणखी पैशाची मागणी करू लागले. पैसे दिले नाही म्हणून त्यांना घरातून हाकलून देण्यात आले.

आशा कांबळे यांच्या फिर्यादीवरून पती- राजु किसन कांबळे, सासु- हौसाबाई किसन कांबळे, सासरे- किसन हरिभाउ कांबळे सर्व राहणार चिंचोडी पाटील, ता. नगर. या तिघां जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय

अहमदनगर लाईव्ह 24