अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :-सध्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती अतिशय बिकट असून ऑक्सिजन व व्हेनटीलेटरची गरज निर्माण झालेली झालेली असून या पार्श्वभूमीवर देशातील विविध सामाजिक संस्थाना मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते.
त्या आवाहनाला प्रतिसाद देत आरोग्य सेवेत उत्तम काम करणाऱ्या स्वास्थ्य या संस्थेने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ३० ऑक्सिजन कॉन्सट्रॆटर उपलब्ध करून देण्यात आले.प्रत्येकी ऑक्सिजन कॉन्सट्रॆटर १ लाख रु.किमतीचे असून एकूण ३० युनिटची किंमत ३० लक्ष आहे.
त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचणार आहेत.प्रशासनाला संकटाच्या काळात केलेल्या सहकार्याबद्दल मा.जिल्हाधिकारी डॉ.श्री.राजेद्र भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अहमदनगर श्री.राजेद्र् क्षीरसागर यांनी पद्मश्री पोपटराव पवार यांचे आभार मानले.
यासाठी डॉ.श्री.आनंद अभय बंग यांनी सहकार्य केल्याबद्दल पद्मश्री पोपटराव पवार यांनी आभार मानले.अहमदनगर जिल्ह्यासाठी आणखी व्हेनटीलेटर मिळण्यासाठी विविध संस्थाकडे प्रयत्न चालू आहेत असे पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगतिले.