ऑस्ट्रियाच्या 31 वर्षीय राजकुमारी यांचे निधन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

ऑस्ट्रियाच्या राजकुमारी मारीया गल्टिझाईन यांचे ४ मी रोजी वयाच्या 31व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांनी भारतीय वंशाचे शेफ ऋषि रूप सिंह यांच्याशी लग्न केले होते.

एना आणि राजकुमार पॉयटर गॅल्टिझाईन यांची मुलगी असलेल्या मारिया यांनी 2017 मध्ये ऋषि रूप सिंह यांनी लग्न केले होते.

ते अमेरिकेतील ह्युस्टन येथे राहत होते. मारिया या ह्युस्टन येथे इंटेरियर डिझाईनर म्हणून काम करत असे.

तर सिंह हे एग्झिक्यूटिव्ह शेफ होते. मारिया यांचा जन्म 1988 मध्ये लग्झमबर्ग येथे झाला होता.

5 वर्षांच्या असताना त्या रशियाला आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण बेल्जियममधून घेतले होते.

त्या कामासाठी ब्रसेल्स, शिकागो, इलिनियोस आणि ह्युस्टन येथे राहत होत्या.

त्यांना तीन बहिणी जेनिया, टटियाना आणि राजकुमारी अलेक्झेंड्रा व दिमित्री आणि लोएन हे दोन भाऊ आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24