Flipkart Sale : 8 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतोय 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या फीचर्स

फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्ही आता खप कमी किमतीत चांगला स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. परंतु, हे लक्षात घ्या की ऑफर फक्त काही काळासाठी असेल.

Flipkart Sale : फ्लिपकार्टवर सध्या बिग सेव्हिंग डेज सेल सुरु आहे. या सेलमध्ये अनेक उपकरणे स्वस्तात खरेदी करू शकता. आता या सेलमध्ये एका तुम्ही आता 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही 8 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या टीव्हीची किंमत 36,990 रुपये इतकी आहे. परंतु, सवलतीमुळे तुम्ही तो स्वस्तात खरेदी करू शकता. जर तुम्हाला हा टीव्ही विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला तो लवकरात लवकर खरेदी करावा लागेल कारण ऑफर मर्यादित काळासाठी आहे.

जर स्मार्ट टीव्ही खरेदी करण्यासाठी तुमचे बजेट जास्त नसेल तर आता फीचर्स किंवा स्क्रीन साइजमध्ये तडजोड करण्याची काहीही गरज नाही. कारण आता तुम्ही दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या Coocaa द्वारे Flipkart सेलदरम्यान सवलतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता.

Advertisement

इतकी मिळत आहे सवलत

भारतीय बाजारात Coocaa 32 इंच HD रेडी LED स्मार्ट Coolita TV ची किंमत 36,990 रुपये इतकी आहे. या स्मार्ट टीव्हीवर सेल दरम्यान मोठी सूट मिळत आहे. या टीव्हवर 78% डिस्काउंट मिळत आहे.

त्यामुळे तुम्ही तो 7,999 रुपयांना खरेदी करू शकता. एवढेच नाही तर ग्राहकांना निवडक बँक कार्ड्ससह अतिरिक्त सवलतींचा लाभही यावर मिळत आहे.

Advertisement

जर तुम्ही अजूनही जुना टीव्ही वापरत असाल आणि तो तुम्हाला एक्सचेंज करायचा असेल, तर तुम्ही या 32 इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर 6,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळवू शकता. या सर्व ऑफर्ससह, तुम्ही 5,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत एक नवीन आणि जबरदस्त फीचर्स असणारा टीव्ही खरेदी करू शकाल.

फीचर्स

कंपनीने या स्मार्ट टीव्हीमध्ये 1366×768 पिक्सेल रिझोल्यूशनसह 60Hz डिस्प्ले पॅनेल दिला आहे. तसेच 20W साउंड आउटपुट देणारे ड्युअल स्पीकर आहेत आणि प्राइम व्हिडिओ ते Youtube पर्यंत OTT अॅप्सला सपोर्ट करते. त्याशिवाय कनेक्टिव्हिटीसाठी यात HDMI, USB, बिल्ट-इन वायफाय आणि ब्लूटूथ सारखे पर्याय दिले आहेत.

Advertisement