निळवंडेतून ३३६० क्युसेकने विसर्ग !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- भंडारदरा धरणात रविवारी (१२ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता पाणीसाठा ११,०३९ दलघफू झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सोमवारी निळवंडे धरणही पूर्ण क्षमतेने भरल्याने लाभक्षेत्रातील नागरिक व शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला.

सोमवारी निळवंडे धरण भरल्यानंतर निळवंडे धरणातून ३३६० क्युसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले. भंडारदरा व निळवंडे धरणातून जास्त प्रमाणात पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे,

अशी माहिती निळवंडे धरण क्षेत्राचे शाखा अभियंता प्रमोद माने यांनी दिली. भंडारदरा पाणलोटक्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु अाहे.

भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग रविवारी सकाळी ३ हजार व सायंकाळनंतर ४४०० क्युसेक होता तो वाढवून सोमवारी सकाळनंतर ७, ७४४ क्युसेक करण्यात आला.

Ahmednagarlive24 Office