अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे बसला ट्रकने पाठिमागून दिलेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले बी नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने कोणाही जखमी झाले नाही.
हा अपघात गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला,यासंदर्भात सविस्तर वृत्त असे कि, घारगाव परिसरात बस स्टँडनजीक नगर-दौंड रोडवर ट्रक क्र. एम.एच.-१८, ९४१७ याने पाठीमागून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक एम.एच. ०६, एस-८०७० ला जोराची धडक दिली.
सदरील ट्रक हा गव्हाचे पोते घेऊन मिरज (जि. सांगली) येथे चालला होता. सदरील बस ही फलटण डेपोची असून मलकापूरवरून फलटणकडे निघाली होती. घारगाव येथे ट्रकने पाठीमागून दिलेल्या धडकेमुळे दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बसमध्ये ३४ प्रवासी होते.