अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हाहाःकार माजवला आहे. महाडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.
अशातच तळई गावात मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये 35 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
रायगडच्या महाडमध्ये ही मोठी दुर्घटना घटली आहे. या दुर्घटनेत 40 जणं अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. तर आतापर्यंत 35 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार भरत गोगावले घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या ठिकाणी त्यांनी मदत व बचाव कार्याचा आढावा घेतला. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,
“तळीयेत दरड कोसळल्यानंतर काही जणांना वाचवू शकलो. पण आता 30 ते 35 लोकं दुर्देवाने मृत्यूमुखी पडलेत.