अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- राज्यात करोना मुळे सर्वत्र अडचणी आहेत, सर्वजण त्यावर मार्ग काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत.
राज्याचे महसुल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे मार्ग दर्शनाखाली विकास साधायचा आहे, महसुल मंत्री ना. थोरात यांचे मार्गदर्शना खाली येत्या एक वर्षात श्रीरामपूर मतदार संघातील ३६ नवे कार्यालय होणार, नव्याने तलाठी कार्यालय इमारती उभारण्यात येणार असल्याची माहीती आमदार लहु कानडे यांनी दिली आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर- घुमनदेव रस्ता, भोकर अडबंगनाथ रस्ता तसेच दिघी रस्ता, खैरी निमगाव ते जाफ्राबाद रस्ता, मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष करण ससाणे हे होते तर जेष्ठ नेते इंद्रभान थोरात, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचीन गुजर, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे,
जिल्हा परीषद बांधकाम समिती चे माजी सभापती बाबासाहेब दिघे,पंचायत समिती सदस्या डॉ. वंदनाताई मुरकुटे, कार्लस साठे, सतिष बोर्डे, सुरेश पवार, अशोक कानडे, राजेंद्र कोकणे, आबा पवार, ॲड. समीन बागवान, सुरेश पवार, हरिभाऊ बनसोडे,आकाश क्षीरसागर, राजेंद्र औताडे,रमेश आव्हाढ आदी प्रमुख उपस्थित होते.
मतदार संघातील दळण वळणा स प्राधान्य देत १९२ कोटी चा निधी आणला, करोना सारख्या संकटावर मात करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयास उप जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्याने येथे आणखी बेडची सुविधा उपलब्ध होणार आहे,
त्याच बरोबर येथे आता २५ बेड बालकांसाठी असणार आहे, ऑक्सीजन कमी पडू नये म्हणून ग्रामीण रुग्णालया जवळ दोन कोटीचा ऑक्सीजन प्लँट उभारणी सुरु आहे त्यामुळे तेथील रुग्णांसाठी बाहेरून ऑक्सीजन आणावा लागणार नाही.
हे सर्व मतदारांच्या आशिर्वादाने शक्य होत आहे. मतदार संघात अद्याप अनेक कामे करायची आहेत, अनेक योजना राबवून त्या सर्वसामान्या पर्यंत पोहचवायच्या आहेत, त्यातून मतदार संघाचा विकास साधायचा असल्याचे यावेळी आमदार कानडे यांनी सांगीतले.
यावेळी सचिन गुजर, करण ससाणे व डॉ. वंदनाताई मुरकुटे आदिंची भाषणे झाली, यावेळी कृषीमित्र सोपान पटारे यांचा सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम पटारे यांनी केले.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सागर शिंदे,भिकाजी पोखरकर, रामदास शिंदे, दिलीप पटारे , नारायण पटारे, एकनाथ लोखंडे, गंगाराम गायकवाड, भाऊसाहेब भोईटे, किशोर मते, भाऊसाहेब पटारे, बाबासाहेब तागड, विठ्ठल आहेर, गणेश छल्लारे,याकोब अमोलीक आदिंसह मान्यवर उपस्थीत होते.