ताज्या बातम्या

देशात कोरोना रुग्णांमध्ये ३९ टक्क्यांनी वाढ

Published by
Ahmednagarlive24 Office

 corona news :देशात कोरोना रुग्णांमध्ये ३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत १२ हजार ६०८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर ७२ जणांचा मृत्यू झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे. देशात सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाख, एक हजार, ३४३ आहे. आतापर्यंत एकूण ४,३६,७०३१५ लोक कोरोनापासून बरे झाले आहेत.

तर ५,२७,२०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण २०८,९५,७९,७२२ लसीचे डोस देण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सरकारने पुन्हा एकदा दक्षता घेण्यास सुरवात केली आहे.

विमानतळावर व विमानांमध्ये प्रवासी व कर्मचाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. हा नियम पायलट, हवाई सुंदरी, फ्लाईट अटेंडंट यांनाही लागू करण्यात आला आहे. दिल्लीत यापूर्वीच सर्व नागरिकांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office