कोरोनाचा प्रकोप पाहता जिल्ह्यातील या गावात ४ दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये स्वयंफुर्तीने लॉकडाऊन करण्यात येत आहे.

यामुळे कोरोनाला अटकाव होईल अशी यामागे धारणा आहे. यातचपाथर्डी तालुक्यातील एका गावाने जनता कर्फ्यू घोषित केला आहे.

पाथर्डी तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन करंजी गावात शनिवार (दि. ३ एप्रिल) ते मंगळवार (दि. ६ एप्रिल) अशा चार दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला.

गावातील परिस्थिती गंभीर होऊ नये. रुग्णांची संख्या वाढू नये. करंजी गावाचा परिणाम परिसरातील इतर ८-१० गावावर होऊ नये यासाठी स्वयंस्फूर्तीने बंदचा निर्णय घेतला आहे.

ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, व्यापारी हे हॉटेल व्यावसायिकांना या बंदच्या फिरून सूचना देत होते.

महामार्गावरील करंजी हा महत्त्वाचा थांबा असल्याने व हॉटेल व्यवसाय येथे प्रमुख व्यवसाय असल्याने अनेक भागातील प्रवासी येथे थांबतात.

यातूनच मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण येथे होत असून दिवसेंदिवस परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी शासनाच्या लॉकडाऊनच्या निर्णयाची वाट न पहाता,

स्वतःच्या जिवासाठी, आरोग्यासाठी तरी आप-आपले व्यवसाय, हॉटेल्स चालकांनी बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन पदाधिकारी व कर्मचारी करीत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24