अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यामुळे मोठी चिंता वाढली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची धक्कादायक आकडेवारी पाहता नागरिकांमध्ये धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यात पाच दिवसांत तब्बल चार हजारावर नव्या बाधितांची भर पडली आहे.
यामध्ये सर्वांधिक नोंद हि शहरामध्ये होताना दिसून येत आहे. यामुळे शहर जवळीलच अकोळनेर गावात गावकर्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
अकोळनेर (ता. नगर) येथील ग्रामस्थांची बैठक झाली. कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. येथे आजपर्यंत १४० नागरिकांना कोरोनाची लागण झाली.
त्यातील आठ लोकांना जीव गमवावा लागला. सध्या बारा नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. खबरदारी म्हणून गाव स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत दूध डेअरी चालू राहील.
मेडिकल व दवाखाने फक्त सुरू राहणार आहेत. गावातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत. तरी गावकऱ्यांनी सहकार्य करावे. विनाकारण फिरू नये, असे आवाहन सरपंच दादा कोळगे व उपसरपंच प्रतीक शेळके यांनी केले.