अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- सेंट्रिंगचे काम उरकून घरी जाणाऱ्या एकास तिघांनी नगर तालुक्यातील सोनेवाडी शिवारातील रानवारा फार्मजवळ अडवून लाथाबुक्यांनी मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी देत, त्याच्याकडील ४० हजाराची रक्कम बळजबरीने काढून घेतली.
या बाबत सविस्तर असे की, नगर तालुक्यातील अकोळनेर येथील मनोज बाळासाहेब धोत्रे हे केडगाव येथील सेंट्रिंगचे काम उरकून घरी जात होते. रानवारा फार्म शिवारात आले असता आरोपींनी मागील भांडणाच्या कारणावरुन त्यांना अडवून लाथाबुक्यांनी मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी देत फिर्यादीच्या खिशातील ४० हजाराची रोख रक्कम घेवून पोबारा केला.
धोत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अजय म्हस्के, प्रदीप ठाणगे व पलास ठाणगे (सर्व रा. केडगाव) या तिघांविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोसई. राऊत हे करत आहेत.