अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मोफत जागांच्या 25 टक्के प्रवेशासाठी 3 मार्चपासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पालकांनी ऑफलाईन पद्धतीने 3 ते 21 मार्चदरम्यान अर्ज भरायचे आहेत. त्यात काही अडचणी आल्यास स्थानिक मदत केंद्रावर, पंचायत समिती किंवा मनपा विभागात संपर्क करावा.
नगर जिल्ह्यात 402 पात्र शाळा असून त्यामध्ये 3013 जागा आहेत. या प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले आहे.
राज्यामध्ये 1 एप्रिल 2010 पासून दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना विना अनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंसहायित शाळांमध्ये किमान 25 टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद आहे.
त्यानुसार पूर्व प्राथमिक व पहिलीच्या वर्गात मोफत प्रवेश दिला जातो. शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी जिल्ह्यात 25 टक्के प्रवेशास ४०२ पात्र असून
त्यामध्ये पूर्व प्राथमिकच्या एकूण 40 व पहिलीच्या एकूण 11 हजार 883 जागा आहेत. 25 टक्के कोट्यातून पूर्व प्राथमिकच्या 10 व पहिलीच्या 3 हजार 3 जागा आहेत.