अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून या विषाणूशी संपूर्ण देश लढू राहिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कोरोना विषाणूशी लढा देणाऱ्या नागरिकांना मदत करण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स देण्याची घोषणा केली आहे.
बीसीसीआयकडून 10 लीटरचे 2000 कॉन्सेट्रेटर्स प्रदान केले जातील. हे कॉन्सेट्रेटर्स येत्या काही महिन्यांत संपूर्ण भारतात वितरित केले जातील. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला,”कोरोनाशी आरोग्य विभाग दिवसरात्र लढा देत आहेत आणि बीसीसीआय त्यांच्या कामाला सलाम करते.
बीसीसीआयनंही नेहमी आरोग्य व सुरक्षा याला प्राधान्य दिले आहे. या ऑक्सिजन संच या फ्रंटलाईन वर्कर्सना मदतच मिळेल आणि लोकं लवकरात लवकर बरी होतील.
दरम्यान, RCBची पॅरेंट कंपनी Diageo यांनीही या लढ्यात 45 कोटींच्या मदतीची घोषणा केली. प्रत्येक राज्यातील व केंद्रशासित प्रदेशातील एका जिल्ह्यात आरोग्य सुविधा उभारण्यासाठी हा निधी वापरला
जाणार आहे.