अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-नगर तालुक्यात प्रशासनातर्फे जेऊर, बुऱ्हानगर, अरणगाव, निंबळक व चिचोंडी पाटील या पाच ठिकाणी कोवीड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या पाच ठिकाणच्या कोवीड सेंटरमध्ये ४५० रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रशासनातर्फे सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, अशी माहिती तहसिलदार उमेश पाटील यांनी दिली.ग्रामसमितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ३६ पर्यवेक्षक नेमलेले आहेत. त्या सर्वांवर नियंत्रण अधिकारी म्हणून नायब तहसीलदार अभिजीत बारवकर काम पाहत अहेत.
कंटेन्मेट झोनचे व्यवस्थापक व ग्रामस्तरीय समितीच्या कामकाजाचे पर्यवेक्षण गटविकास अधिकारी घाडगे करीत आहेत. कोविड सेंटर सुरू असलेल्या ठिकाणच्या संपूर्ण व्यवस्थेची पाहणी उमेश पाटील प्रत्यक्ष भेटीद्वारे करीत आहेत.
कंटेन्मेंट झोनवर तहसीलदार लक्ष ठेवून आहेत. तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे तसेच आरोग्यि वभागातील वैद्यकीय अधिकारी कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेत. कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून नागरिकांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करावे.
मास्कर, सॅनिटायझरचा वापर करावा, सामाजिक अंतराचे पालन करावे. तसेच कोरोना सदृश लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करून उपचार करावा. नागकिांनी न घाबरता कोरोनाला धैर्याने सामोरे जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.