अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-शिष्यवृत्तीसाठी नगर जिल्ह्यातून 47 हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. यामध्ये या परीक्षेसाठी नगर जिल्ह्यातून 2 हजार 19 शाळांच्या 47 हजार 76 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
यात 30 हजार 115 पाचवीचे विद्यार्थी, तर 16 हजार 961 आठवीचे विद्यार्थी आहेत. परीक्षेसाठी पाचवीचे 225 तर आठवीचे 143 केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.
दरम्यान राज्यातील दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पहिली ते अकरावीपर्यंतच्या परीक्षा करोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द झाल्या असल्याने शिष्यवृत्तीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी पुढे येत आहे.
त्यामुळे सध्या तरी शिक्षण विभागाने या परीक्षा आयोजनाचे आदेश दिले असले तरी अंतिम निर्णय काय होतोय याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्यावतीने या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी केंद्र निश्चितीचे काम सुरू होणार आहे. करोनामुळे एप्रिलमध्ये होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलून 23 मे रोजी घेण्याचे शासनाने निश्चित केले आहे.
सध्या तरी शिक्षण विभागाने या परीक्षा आयोजनाचे आदेश दिले असले तरी अंतिम निर्णय काय होतोय याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.