Recharge Plans : दररोज 4GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळतील अनेक फायदे, किंमत आहे फक्त इतकीच..

Recharge Plans : सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या वोडाफोन आयडियाकडे अनेक स्वस्त प्लॅन आहे. कंपनी रिलायन्स जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी आणि आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन प्लॅन्स आणत असते.

कंपनीचा असाच एक प्रीपेड प्लॅन आहे ज्यामध्ये दररोज 4GB पर्यंत डेटा अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक फायदे मिळतात.कंपनीच्या या प्लॅनविषयी सविस्तर जाणून घेऊया.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दिला जातो सर्वात जास्त डेटा

कंपनीच्या 475 रुपयांच्या या प्लॅनमध्ये दररोज 4GB डेटा दिला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्लॅनमध्ये कंपनी फक्त अॅप ऑफर देते. अॅपद्वारे प्लॅनचे सदस्यत्व घेतलेल्या वापरकर्त्यांना 5 जीबी अतिरिक्त डेटा मोफत मिळतो.

प्लॅन तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस देत आहे. 28 दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये तुम्हाला Binge All Night, Data Delights आणि Weekend Data Rollover फायदे मिळतात .

तसेच कंपनीचा 409 रुपयांचा प्लॅन वापरकर्त्यांना रोज 3.5 डेटा ऑफर करतो. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे.फक्त अॅप ऑफरसोबतच यामध्ये 5 जीबी अधिक डेटा दिला जातो. दररोज 100 मोफत एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. तसेच उपलब्ध असलेले अतिरिक्त फायदे फक्त 475 रुपयांच्या प्लॅनसाठी आहेत.

जिओचा फक्त एकच प्लॅन उपलब्ध

जिओचा 400 रुपयांच्या रेंजमध्ये फक्त 419 रुपयांचा एकच प्लॅन असून दररोज 3 GB डेटा, देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस मिळतात. तसेच कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सला Jio अॅप्सचा मोफत प्रवेशही मिळतो.28 दिवसांच्या वैधतेसह या प्लॅन येतो.