अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत नगर शहरात ५ लाख ३० हजार २०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई महापालिकेच्या चार पथकांनी केली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शहरात दक्षता पथक गठीत करण्यात आले आहेत.
परिमल निकम, शशिकांत नजान, कल्याण बल्लाळ, संतोष लांडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सहायक राहुल साबळे, सूर्यभान देवघडे, नंदकुमार नेमाणे, राजेश आनंद, भास्कर आकुबत्तीन,
अमोल लहारे, किशोर जाधव यांनी आतापर्यंत ४८९ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. ही कारवाई मास्क न वापरणारे, गर्दी करणारे नागरिक व दुकानदारांवर करण्यात आली आहे.
१६ मार्चपासून सुरू झालेल्या या कारवाईत आतापर्यंत सुमारे ५ लाख ३० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. २०० रूपये दंड २८१ नागरिक, ५०० रूपये १३८, १ हजार ६, २ हजार १, ५ हजार ४९, दहा हजार १३ जणांना केला आहे.