जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील ५३ गावे झाली कोरोनामुक्त

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असताना नगर जिल्ह्यातील एका तालुक्यातून एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे राहाता तालुक्यातील साठ गावांपैकी ५३ गावांमध्ये करोनाची सक्रीय रुग्णसंख्या शुन्यावर आली असल्याचे दिलासादायक चित्र आहे.(Corona free

)

दरम्यान काही गावे जरी कोरोनामुक्त झाली असली तरी उर्वरीत सात गांवामध्येही केवळ दहा सक्रीय रुग्ण आहेत. तर चौदा गांवाचे शंभर टक्के प्रतिबंधात्मक लसीकरण झाले आहे. कोरोना नियमांचे योग्य पालन यामुळेच हे शक्य झाले असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थ देत आहे.

राहाता तालुक्यात अरोग्य विभाग, महसुल प्रशासन, पंचायत समीती व गांवामधील स्थानिक प्रशासन यांच्या सामुहिक प्रयत्नामुळे तालुक्यातील करोना परीस्थिती नियंत्रणात असून ५३ गांवामध्ये३१ डिसेंबरच्या अहवालानुसार एकही रुग्ण नाही तर उर्वरीत सात गांवामध्ये केवळ दहा सक्रीय रुग्ण आहेत.

तालुक्यातील बहुताश गावात करोनाचा प्रार्दुभाव ओसरत असल्याचे चित्र आहे. दैनंदिन सापडणाऱ्या रूग्णांमध्ये घट आल्याने सक्रीय रुग्णसंख्या असणाऱ्या गावांची संख्याही दर आठवड्यांत कमी होत आहे.

लसीकरण, प्रशासकीय प्रयत्न, नागरिकांची सजगता यामुळे तालुक्यात रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

दरम्यान ओमायक्रॉनच्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी करोनाचे नियम पाळण्याचे व प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडुन केले जात आहे.

Ahmednagarlive24 Office