अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-गेल्या 24 तासात भारतात 53,480 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 354 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 41, 280 नागरिक बरे झाले आहेत.
भारतात कोरोनाचे 1,21,49,335 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 5,52,566 झाली आहे. एकूण 1,14,34,301 नागरिक बरे झाले आहेत.
देशात मृतांचा आकडा 1,62,468 आहे. आतापर्यंत देशात 6,30,54,353 नागरिकांचे लसीकरण झाले. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 10 , 22 , 915 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण 24,36,72,940 चाचण्या घेण्यात आल्या.