अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-पोलीस दलात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनिय प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे पोलीस पदक महाराष्ट्र दिनी जाहीर करण्यात आले आहे.
यामध्ये जिल्हा पोलीस दलात काम करणार्या सहा पोलिसांचा समावेश आहे. या सहा पोलिसांना ‘पोलीस महासंचालक’ पदक जाहिर सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद अर्जुन चिंचकर, राज्य गुप्त वार्ता विभागाचे पोलीस हवालदार कृष्णा बबनराव विधाटे,
पोलीस हवालदार विश्वास अर्जुन बेरड, पोलीस नाईक शरद मारूती बुधवंत, देवेंद्र दिलीप शेलार, पोलीस शिपाई गणेश कलगोंडा पाटील यांना हे पदक जाहिर झाले आहेत.
तसेच पाथर्डी तालुक्यातील सुपुत्र पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांना नक्षलवाद्यांविरुद्ध केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे.