65 Inch Smart TV : स्वस्तात खरेदी करा ‘या’ लोकप्रिय कंपनीचे 65 इंच टीव्ही, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

65 Inch Smart TV : भारतीय बाजारात आता Haier ने आपल्या स्मार्टटीव्हीची नवीन श्रेणी लॉन्च केली आहे. या नवीन टीव्ही सीरिजचे Haier K800GT TV नाव आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टटीव्ही खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

कंपनीचे हे नवीन Google TV 43, 50, 55 आणि 65 इंच आकारात येतात. यात कंपनीकडून 3840×2160 पिक्सेल रिझोल्यूशनसह 4K अल्ट्रा HD डिस्प्ले मिळत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या स्मार्ट टीव्हीची किंमत तुमच्या बजेटमध्ये आहे.

या स्मार्ट टीव्हीची सुरुवातीची किंमत 16990 रुपये इतकी आहे. जो तुम्ही Haier च्या ई-स्टोअर आणि इतर रिटेल आउटलेट्समधून देखील सहज खरेदी करू शकता. जाणून घ्या याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनीच्या या शानदार स्मार्ट टीव्हीमध्ये उत्कृष्ट पिक्चर क्वालिटी ऑफर केली आहे. तुम्हाला यात उत्कृष्ट चित्र गुणवत्तेसाठी, HDR10 आणि MEMC तंत्रज्ञान पाहायला मिळेल. हे वापरकर्त्यांना गुळगुळीत कंटेंट आणि वाइब्रेंट ट्रांजिशनसह उत्कृष्ट अनुभव देते.

यामध्ये शक्तिशाली आवाजासाठी, कंपनीकडून नवीन टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओसह 24-वॉट स्पीकर सेटअप देण्यात आला आहे. स्टोरेजचा विचार केला तर हे टीव्ही 2 GB रॅम आणि 32 GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहेत. याच्या प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर हा TV Mali-G52 GPU सह येतो. आणि कंपनी या स्मार्ट टीव्हीमध्ये मल्टी-कोर Cortex A55 चिप्स देत आहेत.

शिवाय नवीन टीव्ही Google TV OS वर काम करतो. इतकेच नाही तर यामध्ये कंपनीचे नेटफ्लिक्स, डिस्ने हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि यूट्यूब अॅप्स इन-बिल्ट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच हे टीव्ही गुगल असिस्टंटलादेखील सपोर्ट करतात. कंपनीचे हे सर्व टीव्ही क्रोमकास्टने सुसज्ज असून यात कनेक्टिव्हिटीसाठी, तुम्हाला USB 2.0 पोर्ट आणि HDMI 2.1 सह ब्लूटूथ 5.1 आणि Wi-Fi सारखे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.