त्या पाणी योजनेसाठी ६८.९६ लाखांचा निधी मंजूर !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोरोना संकटातही तालुक्यातील विविध गावांकरिता सातत्याने निधी मिळवला असून त्यांच्या पाठपुराव्याने ओझर खुर्द

येथील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ६८ लाख ९६ हजार ६७२ रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी दिली.

इंद्रजित थोरात म्हणाले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोरोना संकटातही तालुक्यातील वाडी-वस्तीवर विकासासाठी अनेक योजना राबवल्या. याचबरोबर संगमनेर शहर व तालुक्यासाठी सातत्याने मोठा निधी मिळवला.

ओझर खुर्द नळपाणी पुरवठा योजनेसाठी मंत्री थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत ६८ लाख ९६ हजार ६७२ रुपयांचा निधी मिळवला. यामुळे ओझर गावची पाणीपुरवठा योजना सुरळीत होणार असून गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे मुबलक व स्वच्छ पाणी मिळणार आहे.

संगमनेर तालुक्यातील विकास कामांचा वेग व घोडदौड कायम असून नगर जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका असूनही प्रत्येक गावच्या वाडी-वस्तीवर सातत्याने कामे सुरू आहेत. दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामंही अत्यंत गती घेतली.

हे ऐतिहासिक कामही लवकर मार्गी लागणार असून पुढील वर्षीच्या पावसाळ्यात दुष्काळग्रस्तांना या कालव्यांद्वारे निश्चित पाणी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

ओझर खुर्द येथे नळ पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मिळवून दिल्याबद्दल ओझर गावातील नागरिकांनी महसूल मंत्री थोरात, इंद्रजित थोरात, शांताबाई खैरे, विजय हिंगे यांचे अभिनंदन केले.

अहमदनगर लाईव्ह 24