श्रीरामपूर तालुक्यात करोनाचे 69 रुग्ण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-जिल्ह्यात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यामुळे मोठी चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस वाढणारी आकडेवारी पाहता जिल्ह्यात लॉकडाऊन होणार कि काय ? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

दरम्यान श्रीरामपूर तालुक्यात गेल्या 24 तासात करोनाचे नवीन 69 रुग्ण सापडले आहेत. तर 325 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

जिल्हा रुग्णालयात 14, खासगी रुग्णालयात 51 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 04 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 23 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 325 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 561 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. त्यातील 236 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 325 रुग्ण विविध कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

दरम्यान सर्व नागरिकांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर करोनाशी मुकाबला करण्यासाठी नियमाचे पालन करावे. सर्वांनी सोशल डिस्टन्स पाळावे, गर्दी करू नये, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच मास्कचा वापर कायम करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24