नगर तालुक्यातील ‘या’ गावात 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णसंख्येत होणारी वाढ व मुत्यूचे वाढलेले प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी निंबळक ग्रामपंचायतीने सात दिवसाचा कडक लॉक डाऊन जाहीर केला आहे.

लॉक डाऊनचे नियम तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा सरपंच प्रिंयका लामखडे यांनी दिला आहे. निंबळक (ता. नगर) येथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. या भागातील ८० टक्के नागरिक, महिला नोकरीनिमित्त एमआयडीसी येथील कारखान्यात कामाला जात आहेत.

एमआयडीसी परिसरातील गावे, नगर शहरातून जवळपास २५ ते ३० हजार कामगार कामाला येतात. यामुळे संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे तातडीने निंबळक ग्रामपंचायतीने सात दिवसाचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे .

दवाखाने , मेडिकल चोवीस तास, दुध डेअरी सकाळी दोन तास चालू राहणार आहे. बाकी सर्व दुकाने बंद राहणार आहे. या बाबत लेखी आदेश ही काढलेला आहे. या लॉकडाऊनसाठी प्रशासनाने सहकार्य करण्याची गरज आहे. तरच लॉकडाऊन यशस्वी होईल.

एमआयडीसी येथील पोलीस प्रशासनाने दोन तीन वेळेस पेट्रोलिंग करावी. विनाकारण फिरताना आढळून आल्यास त्याच्यावर योग्य कार्यवाही करावी दंड करावा\.

तसेच नागरिकानी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये स्वतःची काळजी घ्यावी, कोरोनाची लक्षणे जाणवल्यास तात्काळ विलगीकरण कक्षात किंवा कोवीड सेंटर ला जाऊन उपचार घ्यावे असे आवाहान सरपंच प्रिंयका लामखडे यांनी केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24