Asha Worker Strike : आशा कर्मचाऱ्यांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ व गट प्रवर्तकांना सहा हजार २०० रुपये मानधन वाढ आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जाहीर केली; मात्र आदेश काढण्यास ते टाळाटाळ करत आहेत.
या गोष्टीचा निषेध करत आज १२ जानेवारीपासुन आशा व गट प्रवर्तक बेमुदत संपावर गेले आहेत, अशी माहिती आयटक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. कॉ. सुधीर टोकेकर व जिल्हा संघटक सुरेश पानसरे यांनी दिली आहे.
याबाबत पत्रकात टोकेकर व पानसरे यांनी सांगितले, की कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क व भाऊबीज, आरोग्यवर्धिनीचे १५०० रुपये हे सर्व विनाविलंब आशा कर्मचाऱ्यांना मिळाले पाहिजे. जोपर्यंत आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या वाढीच्या घोषणांप्रमाणे शासन आदेश निघ नाही,
तो पर्यंत हा संप मागे घेतला जानार नाही असा निर्धार आशा कर्मचारी संघटनेने केला आहे. २९ डिसेंबर पासुन आशा कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ऑनलाईन कामाबाबद सक्ती करू नये अन्यथा त्या विरोधातही आंदोलन करण्यात येईल.
टोकेकर यांनी सांगीतले, महाराष्ट्रातील आशा व गट प्रवर्तक महिलांनी ८ ऑक्टोबरपासुन बेमुदत संप केलेला होता. या संदर्भात ८ नोव्हेंबरपासुन सन्मानीय तडजोड झाली. त्या मध्ये महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शासकीय आदेश अद्याप मिळालेला नाही.
या घटनेस दोन महीने झाले आहेत, तरी महाराष्ट्र शासन काही निर्णय घेण्यास तयार नसल्यामुळे महाराष्ट्रातील आशा व गट प्रवर्तक महिलानमध्ये महाराष्ट्र शासनाविरुद्ध प्रचंड असंतोष वाढत चाललेला आहे. महाराष्ट्रात ४ डिसेंबरपासून सुरु असलेल्या
अंगणवाडी महीलांच्या संपाला पूर्ण पाठींबा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आशा कर्मचारी व गट प्रवर्तक यांनी या संपामध्ये भाग घ्यावा, असे आवाहन टोकेकर व पानसरे यांनी केले आहे.