7th Pay Commission Breaking : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा मानला जात आहे. कारण कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांचा डीआर किती टक्क्यांनी वाढणार हे जवळपास निश्चित होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आज दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आज सोमवारी जून महिन्याचे AICPI निर्देशांकाचे आकडे येणार आहेत. त्यानंतर कर्मचाऱ्यांचा DA आणि पेन्शनधारकांचा DR किती वाढणार हे निश्चित होईल.
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दर सहा महिन्यांनी वाढवण्यात यतो. महागाईचा आढावा आणि AICPI डेटाच्या आधारे केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करत असते. यावर्षी मार्च महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ करण्यात आली होती.
मात्र कर्मचाऱ्यांची दुसरी DA वाढ करण्यात आलेली नाही. कर्मचाऱ्यांची पहिली DA वाढ जानेवारी महिन्यात करण्यात येते. तर दुसरी DA वाढ जुलै महिन्यामध्ये करण्यात येत असते. मात्र अद्याप कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आलेली नाही.
कर्मचाऱ्यांच्या जानेवारमधील DA वाढीची घोषणा होळीच्या आसपास होत असते. तर जुलै महिन्यातील DA वाढीची घोषणा रक्षाबंधन आणि दिवाळी दरम्यान होत असते. मात्र आज कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा दिवस आहे.
AICPI चा सहा महिन्यांपैकी ५ महिन्यांचा डेटा आता आहे तर अजून एका महिन्याचा डेटा येणे बाकी आहे. AICPI कडून अजून जून महिन्याचा डेटा आलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये किती वाढ होणार हे अजून निश्चित नाही. AICPI कडून आज जून महिन्याचा डेटा जाहीर केला जाऊ शकतो.
कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ४ टक्के वाढ होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. मात्र अद्याप कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये किट टक्के वाढ होणार आहे हे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये किती टक्के वाढ होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्के आहे. गेली DA वाढ ४ टक्क्यांनी करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा DA ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के झाला आहे. तसेच आताही सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ४ टक्के वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने येत्या काही दिवसांत कर्मचाऱ्यांचा DA ४६ टक्के होऊ शकतो.
कर्मचाऱ्यांची मागील DA वाढ होळीपूर्वी मंजूर करण्यात आली होती. आता कर्मचाऱ्यांना लवकरच दुसरी DA वाढीची भेट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा DA ४६ टक्के होईल आणि त्यांच्या पगारात मोठी वाढ देखील होईल. 47 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना DA आणि DR वाढीचा फायदा होणार आहे.