7th Pay Commission :- केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांच्या पगाराव्यतिरिक्त ते 30 हजार रुपयांचा लाभ घेऊ शकतात. कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्त्यासह अनेक भत्त्यांचा लाभ मिळतो, पण हे 30 हजार रुपये या भत्त्यांपेक्षा वेगळे आहेत.
‘ही’ रक्कम पाच पटीने वाढली – केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन रकमेत पाचपट वाढ केली आहे. आता पीएचडीसारखी उच्च पदवी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना १० हजारांऐवजी ३० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळणार आहे.
पूर्वी किमान 2 हजार रुपये मिळत होते – मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्मिक मंत्रालयाने उच्च पदवी प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन रक्कम वाढवली आहे. यासाठी मंत्रालयाने 20 वर्षे जुन्या नियमांमध्ये बदल केला आहे. यापूर्वी उच्च पदवी मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांना 2 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम दिली जात होती.
2019 मध्ये दुरुस्ती करण्यात आली – 2019 मध्ये किमान प्रोत्साहन रक्कम 2 हजार रुपयांवरून 10 हजार रुपये करण्यात आली होती. कार्मिक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 3 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीची पदवी किंवा डिप्लोमा असलेल्या कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपयांचे प्रोत्साहन मिळेल.
तसेच जर एखाद्या कर्मचाऱ्याने 3 वर्षांपेक्षा जास्त काळ पदवी किंवा डिप्लोमा घेतला तर त्याला 15 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळेल. पदव्युत्तर पदवी किंवा 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीचा डिप्लोमा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना 20 हजार रुपये मिळतील.
…तर तुम्हाला 30 हजार रुपये मिळतील – त्याचप्रमाणे पदव्युत्तर पदवी किंवा 1 वर्ष किंवा त्याहून जास्त कालावधीच्या डिप्लोमामध्ये 25 हजार रुपये मिळतील. व पीएचडी किंवा त्याच्या समकक्ष पात्रता असलेल्या कर्मचाऱ्यांना 30 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल.
प्रोत्साहन रक्कम मिळण्यासाठी या अटी आहेत – कर्मचाऱ्याच्या पदाशी संबंधित आणि त्याच्या कामाशी संबंधित असलेल्या पदव्या किंवा डिप्लोमावरच प्रोत्साहनाची रक्कम उपलब्ध आहे हे स्पष्ट झाले असेल. सक्षमता आणि काम यांचा संबंध असावा, अशा स्पष्ट सूचना आहेत. निव्वळ शैक्षणिक आणि साहित्यिक विषयांना प्रोत्साहन दिले जात नाही.