7th Pay Commission DA : गेल्या दोन महिन्यांपासून केंद्रीय कर्मचार्यांच्या (Central Employees) डीएच्या (DA) महागाई भत्त्याबाबत बरीच चर्चा होती. मात्र आता महागाई भत्ता जाहीर झाला आहे .
यावेळी महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (All India Consumer Price Index) औद्योगिक कामगारांचे आकडे समोर आल्यानंतर महागाई भत्त्यात चांगली वाढ होणार हे निश्चित होते.
मात्र आता त्याची घोषणा झाली असून जून महिन्यात निर्देशांक 0.2 अंकांनी वाढला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणार आहे.
DA किती वाढणार हे कसे ठरवले जाते
AICPI-IW (All India Consumer Price Index – Industrial Workers) च्या पहिल्या सहामाहीसाठी डेटा जारी करण्यात आला आहे. यामध्ये निर्देशांक 0.2 अंकांनी वाढून 129.2 वर पोहोचला आहे.
कर्मचार्यांचा महागाई भत्ता ठरवण्यासाठी सरकार या निर्देशांकाचा डेटा वापरते. निर्देशांकातील वाढीमुळे DA (DA Hike
) मध्ये 4 टक्के वाढ झाली आहे असं तज्ञ दावा करत आहेत. या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होणार आहे. एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे.38 टक्के डीएचे पैसे कधी येणार?
महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. नवीन महागाई भत्ता सप्टेंबर 2022 च्या पगारात दिला जाईल. यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांची थकबाकीही येणार.
नवीन महागाई भत्ता 1जुलै 2022 पासून लागू मानला जाईल. एकंदरीतच नवरात्रीच्या काळात सरकार हा भत्ता जमा करणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खिशात मोठा पैसा जाणार आहे.
पगारात काय फरक पडेल
7व्या वेतन आयोगात किमान मूळ वेतन 18,000 रुपये आणि कॅबिनेट सचिव स्तरावर 56900 रुपये आहे. 38 टक्क्यांनुसार, 18000 रुपयांच्या मूळ पगारावर वार्षिक DA मध्ये एकूण 6840 रुपयांची वाढ होईल.
एकूण डीए दरमहा 720 रुपयांनी वाढणार. 56,900 रुपयांच्या कमाल मूळ वेतनाच्या ब्रॅकेटमध्ये, वार्षिक महागाई भत्त्यात एकूण वाढ 27,312 रुपये होईल. या पगाराच्या ब्रॅकेटमधील लोकांना 34% च्या तुलनेत 2276 रुपये अधिक मिळतील.