7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central employees) एक आनंदाची बातमी आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात सरकारकडून (Govt) कर्मचाऱ्यांना 3 प्रकारचे गिफ्ट मिळणार आहेत. त्यापैकी पहिले गिफ्ट म्हणजे महागाई भत्ता (DA).
महागाई भत्त्यात (Dearness Allowance) पुन्हा एकदा 4 टक्क्यांनी वाढ (Dearness Allowance Increase)होणार आहे.त्यामुळे महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 38 टक्के इतका होणार आहे.
दुसरी भेट, डीएच्या थकबाकीवर (DA arrears) सरकारसोबत सुरू असलेल्या चर्चेवर निर्णय येऊ शकतो. त्याच वेळी, तिसरी भेट भविष्य निर्वाह निधीशी संबंधित आहे, ज्या अंतर्गत पीएफ खात्यातील व्याजाचे पैसे ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरमध्ये येतील. म्हणजेच या महिन्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम येणार आहे.
पुन्हा DA वाढणार
वास्तविक, DA मधील वाढ AICPI च्या डेटावर अवलंबून आहे. तत्पूर्वी, कर्मचार्यांच्या डीएमध्ये वाढ देखील मे महिन्याच्या AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार निश्चित करण्यात आली होती.
फेब्रुवारीनंतर वेगाने वाढणाऱ्या एआयसीपीआय निर्देशांकाची आकडेवारी येण्यापूर्वीच जूनचा एआयसीपीआय निर्देशांक मे महिन्यापेक्षा जास्त असेल अशी अपेक्षा होती. जूनमध्ये AICPI निर्देशांकात मोठी झेप घेतली आहे.
मे महिन्यात त्यात 1.3 अंकांची वाढ होऊन ती 129 अंकांपर्यंत वाढली होती. जूनचा आकडा 129.2 वर पोहोचला आहे. आता सप्टेंबरमध्ये महागाई भत्त्यात 4% वाढ अपेक्षित आहे.
डीए थकबाकीबाबत चर्चेचा निर्णय
विशेष म्हणजे, 18 महिन्यांपासून प्रलंबित थकबाकी प्रकरण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचले आहे, त्यावर लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.
अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून लवकरच महागाई भत्ता मिळेल, अशी केंद्रीय कर्मचाऱ्यांना पूर्ण आशा आहे. कोविड-19 महामारीमुळे अर्थ मंत्रालयाने मे 2020 मध्ये 30 जून 2021 पर्यंत डीए वाढ थांबवली होती.
पीएफ व्याजाचे पैसेही मिळतील
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या 7 कोटींहून अधिक खातेदारांच्या खात्यात व्याजाची चांगली बातमी मिळू शकते. विशेष म्हणजे, या महिन्याच्या अखेरीस, पीएफ खातेधारकांच्या बँक खात्यात व्याजाचे पैसे हस्तांतरित केले जाऊ शकतात.
कारण आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पीएफची गणना केली गेली आहे. यावेळी 8.1% नुसार पीएफचे व्याज खात्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.