7th Pay Commission : केंद्र सरकारने (Central Goverment) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे (Central Staff) अच्छे दिन येणार असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारातही मे महिन्यात वाढ होणार आहे.
केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness allowance) ३ टक्क्यांनी वाढ केली आहे. यासह केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ टक्क्यांवरून ३४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
यासोबतच अर्थ मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. वाढीव महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासूनच लागू होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
या अधिसूचनेमध्ये 1 जानेवारी 2022 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 31 टक्क्यांवरून 34 टक्के करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
एप्रिल महिन्याचा पगार वाढणार (Salary increase) असल्याचे सरकारने म्हटले आहे. यासोबतच जानेवारी ते मार्च महिन्यातील थकबाकीही कर्मचाऱ्यांना मे महिन्यातील देण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारच्या या घोषणेचा एक कोटींहून अधिक सरकारी कर्मचारी (Government employees) आणि निवृत्ती वेतनधारकांना म्हणजे ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांना मिळणारा महागाई सवलत मिळून सरकारी तिजोरीवर वार्षिक ९,५४४.५० कोटी रुपये खर्च होतील.
प्रत्यक्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन १८,००० ते ५६,९०० रुपये आहे. महागाई भत्ता 34 टक्के असताना किमान मूळ पगाराची गणना पाहिली तर केंद्रीय कर्मचार्याचे किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे. डीए ३४ टक्के झाल्यानंतर तो ५५८० रुपयांनी वाढून ६१२० रुपये प्रति महिना होईल.
म्हणजेच दरमहा 540 रुपयांनी पगार वाढणार आहे. अशा स्थितीत मे महिन्यात मूळ वेतन 18,000 रुपये असलेल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात 2160 रुपये (540X4 = 2160) वाढतील. दुसरीकडे, वार्षिक आधारावर पगारावर नजर टाकली तर त्यात ६,४८० रुपयांची वाढ दिसून येते.
त्याच वेळी, कमाल मूळ वेतन 56,900 च्या वेतनात 1707 रुपयांची मासिक वाढ होईल. अशा स्थितीत, मे महिन्यात 56,900 रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात 6828 रुपये (1707X4 = 6828) वाढतील. त्यानुसार या कर्मचाऱ्यांच्या पगारात वार्षिक आधारावर 20,484 रुपयांनी वाढ होणार आहे.