7th Pay Commission : सरकारी कर्मचारी वर्गासाठी आनंदाची बातमी ! अखेर मोदी सरकारने तो निर्णय घेतलाच…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Money News :- केंद्र सरकारने आपल्या 50 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि 65 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ केली आहे.

यावेळी डीएमध्ये ३ टक्के वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२२ पासून वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे.

आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ३४ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ३१ टक्के तरतूद होती. कर्मचार्‍यांच्या मार्चच्या पगारासह महागाई भत्त्यात 3% वाढ झाल्यानंतर, नवीन DA खात्यात जमा होईल.

महागाई भत्त्यात (डीए) वाढीसोबतच जानेवारी-फेब्रुवारीची थकबाकीही दिली जाईल. महागाई भत्ता 34 टक्के असताना किमान मूळ पगाराची गणना पाहिली तर केंद्रीय कर्मचार्‍याचे किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे.

डीए ३४ टक्के झाल्यानंतर तो वाढून ६,१२० रुपये प्रति महिना होईल. म्हणजेच दरमहा ५४० रुपयांनी वाढणार आहे. वार्षिक पगारावर नजर टाकली तर त्यात 6,480 रुपयांची वाढ दिसून येते.

त्याच वेळी, कमाल मूळ वेतनात 1707 रुपयांनी वाढ होणार आहे. त्यानुसार या कर्मचाऱ्यांच्या पगारात वार्षिक आधारावर 20,484 रुपयांनी वाढ होणार आहे.