7th Pay Commission : आनंदाची बातमी ! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात या दिवसापासून होणार मोठी वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : केंद्र सरकारकडून (Central Goverment) वेळोवेळी सरकारी कर्मचाऱ्यांचे (Government employees) जीवमान सुधारावे यासाठी महत्वाचे निर्णय घेतले जातात. गेल्या काही महिन्यापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्यात आली आहे.

तुम्हीही केंद्र सरकारसाठी काम करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पगारवाढीच्या (Salary increase) प्रतिक्षेत असलेल्या देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार मोठी भेट देणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. १ जुलैपासून सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहेत.

सरकार महागाई भत्त्यात वाढ करणार आहे

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी महागाई भत्त्यात (डीए) वाढ करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १ जुलैपासून वाढणार आहे.

महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ जाहीर करण्यात आली आहे. म्हणजेच आतापर्यंत ज्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३४ टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता, तो आता ३८ टक्के होणार आहे.

जर तुमचा किमान मूळ वेतन 18 हजार रुपये दरमहा असेल तर तुम्हाला वार्षिक 38 टक्के दराने 6840 रुपये महागाई भत्ता मिळेल. म्हणजेच प्रत्येक महिन्यानुसार तुमचा पगार ७२० रुपयांनी वाढेल. तुमचा पगार वार्षिक आधारावर 8,640 रुपयांनी वाढेल.

दुसरीकडे, जर आपण कमाल पगाराबद्दल बोललो, तर 56,900 रुपयांच्या मूळ पगारावर 38 टक्के दराने वार्षिक 21,622 रुपये महागाई भत्ता मिळेल. म्हणजेच महिन्यानुसार पाहिल्यास पगार 2,276 रुपयांनी वाढेल. त्यानुसार वार्षिक पगारात 27,312 रुपयांची वाढ होणार आहे.

एआयसीपी इंडेक्सच्या (AICP Index) आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात महागाईचा आकडा १२५.१ होता, तर फेब्रुवारीमध्ये १२५ होता. याशिवाय मार्चबद्दल बोलायचे झाले तर या महिन्यात ती वाढून 126 झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तो 126 वर गेला तर सरकारकडून डीएमध्ये 4 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल.