8 Seater Cars In India: ‘ह्या’ आहे देशातील बेस्ट 8 सीटर कार्स ! किंमत आहे फक्त 13 लाख ; जाणून घ्या त्यांची खासियत

8 Seater Cars In India: मागच्या काही दिवसांपासून भारतीय ऑटो बाजारात 7 सीटर कार्सना मोठ्या प्रमाणात मागणी पहिला मिळत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या MPV कार्समध्ये तुम्ही एकच वेळी अनेक काम करू शकतात.

त्यामुळे सध्या बाजारात 7 सीटर कार्स खरेदीसाठी अनके पर्याय उपलब्ध आहे. याच तुम्ही जर 7 सीटरच्या जागी 8 सीटर कार खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला देशात उपलब्ध असणाऱ्या काही 8 सीटर कार्सबद्दल माहिती देणार आहोत ज्याचा तुम्हाला 8 सीटर कार खरेदी करताना फायदा होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Toyota Innova Crysta

एमपीव्ही कारच्या यादीत इनोव्हा क्रिस्टा हे सर्वात लोकप्रिय नाव आहे. वर्षानुवर्षे ते ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. या वाहनाची किंमत 18.09 लाख रुपयांपासून सुरू होते. त्याचे 8 सीटर व्हेरिएंट 18.14 लाख रुपये (एक्स-शोरूम) मध्ये उपलब्ध असेल. हे वाहन 2.7-लीटर पेट्रोल इंजिन (166PS आणि 245Nm) सह येते.

Lexus LX

या यादीतील ही सर्वात महागडी कार आहे. त्याची किंमत 2.63 कोटी रुपये आहे. अतिशय शक्तिशाली इंजिन आणि शक्तिशाली फीचर्ससह येणारी ही SUV 8 लोक बसू शकते. यात 5663 cc इंजिन आहे, जे 362 bhp आणि 530 Nm जनरेट करते. ही SUV 0-100kmph चा वेग 7.7 सेकंदात पकडते.

Mahindra Marazzo

ही महिंद्रा एमपीव्ही विक्रीच्या बाबतीत आपली जादू दाखवू शकली नाही, परंतु फीचर्सच्या बाबतीत ती कुणापेक्षा कमी नाही. त्याची किंमत 13.41 लाख रुपयांपासून सुरू होते. त्याचा बेस M2 व्हेरिएंट तुम्हाला फक्त 8 जागांचा पर्याय देतो. याला 1.5-लिटर डिझेल इंजिन (122PS आणि 300Nm) चा पर्याय देण्यात आला आहे, जो 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडला गेला आहे.

हे पण वाचा :- IMD Alert : पुन्हा धो धो पाऊस ! ‘या’ राज्यांमध्ये अलर्ट जारी ; वाचा सविस्तर अपडेट्स