शेतीच्या वादातून 80 वर्षाच्या वृद्धेला बेदम मारहाण; माजी उपसरपंचासह सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- ऊस तोडू नका म्हटल्याचा राग येवून झालेल्या हाणामार्‍यात एक वृद्ध शेतकरी महिला जखमी झाली. हा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथे घडला.

याप्रकरणी खोकर येथील माजी उपसरपंचासह सहा जणांविरूद्ध श्रीरामपूर तालुका पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोकर गावालगत असलेल्या शेतीवरून दत्तात्रय कचरे कुटंबियांचे किशोर काळे यांचसोबत न्यायालयीन वाद सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, काळे कुटुंबीय यांनी शेतात येऊन ऊस तोडणी सुरू केली हा आवाज आल्याने इंदुबाई कचरे तिकडे गेल्या. तुम्ही ऊस का तोडत आहात? असे विचारले असता किशोर काळे यांनी आम्हाला धमकावले.

तसेच या गोष्टीला विरोध केला असता मला खाली पाडून लाथाबुक्क्याने मारहाण केली तसेच किशोर काळे यांनी माझ्याकडे बंदूक आहे, मी तुला गोळी घालून ठार मारून टाकीन अशी धमकी दिली असल्याचे इंदुबाई कचरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी किशोर पांडूरंग काळे, माजी उपसरपंच नानासाहेब मच्छिंद्र काळे, दिनकर मच्छिंद्र काळे, कैलास सिताराम भणगे, श्रीकांत जगन्नाथ भणगे यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस नाईक पिनु ढाकणे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24