ताज्या बातम्या

भावा हे काय झालं? आठ हजार उमेदवार ‘टीईटी’साठी कायमचे बाद

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News:राज्यात झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतीली घोटाळ्यात संबंधित असलेल्या सुमारे आठ हजार उमेदवारांना यापुढे कोत्याही शिक्षक पात्रता परीक्षेला बसता येणार नाही.

परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत गैरप्रकार करून पात्रता परीक्षेतील उत्तीर्ण प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ७,८९० 7880 उमेदवारांवर ठेवण्यात आला आहे.

त्यांनी मागील परीक्षेतील मिळविलेले यशही रद्द ठरविण्यात आले आहे. या उमेदवारांना भविष्यात कोणत्याही प्रकारे पात्रता परीक्षेला बसण्याची अनुमती देण्यात येणार नाही.

त्यामुळे या विद्यार्थ्यांना यापुढे कोणत्याही परिस्थितीत सरकारी सेवेत शिक्षक म्हणून काम करता येणार नाही. पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसल्यामुळे कोणत्याही शाळेत नियुक्तीची संधी उपलब्ध होणार नाहीत.

त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य आता अंधारमय झाले आहे. बालकांचा मोफत व शिक्षणाचा अधिकार अधिनियम लागू झाल्यानंतर शिक्षक भरतीसाठी डी.एड, बी.एड या पदवी व पदविकेसोबतच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आले.

या परीक्षेचा निकाल तीन ते चार टक्क्यांच्या आसपास लागत असल्यामुळे पुढे त्यात गैरप्रकार सुरू झाले. पात्रता परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या एजन्सीच्या लोकांनी गैरकारभार करण्यासाठी प्रयत्न केले होते.

पोलिसांनी कंपनीच्या व्यवस्थापकांसोबतच परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्यावरती देखील गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली.

यातील परीक्षार्थींची उत्तरपत्रिकांची कसून तपासणी केली असता ७८८० उमेदवारांनी परीक्षेत गैरप्रकार केले असल्याचे समोर आले आहेत. त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

Ahmednagarlive24 Office