‘त्या’ ग्रामपंचायतींना ८५ लाखांचे व्यायाम शाळा साहित्य वाटप : राज्यमंत्री तनपुरे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:-  राहुरी विधानसभा मतदारसंघातील १७ ग्रामपंचायतींना ८५ लाख रुपये किंमतीचे व्यायाम साहित्य मंजूर झाल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

सर्वसाधारण जिल्हा विकास योजनेतंर्गत राहुरी तालुक्यातील सडे व नगर तालुक्यातील वारूळवाडी ग्रामपंचायतीला प्रत्येकी ५ लाख रुपये किंमतीचे व्यायाम साहित्य तसेच जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत व्यायामशाळा विकास योजनेतून राहुरी तालुक्यातील वांबोरी,

चेडगाव, ब्राम्हणी, जांभळी, वावरथ, तांदूळवाडी, शिलेगाव, कात्रड, केंदळ, कोंढवाड, पाथर्डी तालुक्यातील शिरापूर, लोहसर, भोसे, कोल्हार,

राघेहिवरे या गावांना खुले बंदिस्त व्यायामशाळा प्रत्येकी ५ लाख रुपयांचे साहित्य मंजूर झाले. या साहित्याचा पुरवठा देखील सुरू झाला.

पुढील वर्षात मतदार संघातील गावात व्यायामशाळा साहित्य मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24