मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला 12 वर्षाचा मुलागा नदीप्रत्रात बुडाला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- संगमनेर खुर्द येथील प्रवरानदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या पाच बालकांपैकी एकजण बुडाल्याची घटना घडली आहे.

या दुर्घटनेत यश कृष्णा आडेप (वय 12, रा. पदमानगर) याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान यश हा आपल्या चार मित्रांसह काल दुपारी प्रवरानदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. सर्व मित्र पाण्यात पोहत होते.

यातील यश आडेप हा अचानक पाण्यात बुडाला. तो पाण्यात बुडाल्याचे समजताच इतर मुलांनी आरडाओरड केली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या ऋषिकेश रमेश मोहन याने यश याला वाचविण्याचा प्रयत्न केला.

प्रवरा पात्रात पाणी जास्त असल्याने यश हा वाहून गेला. नदीपात्रात मुलगा बुडाल्याची माहिती मिळताच अनेक नागरिकांसह पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत यश याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र तो आढळून आला नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24