अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-बहिणीबरोबर झालेल्या भांडणातून वडिलांनी आपल्याला मारलं याचा राग आल्याने १३ वर्षीरू मुलाने वडिलांच्या पोटात चाकू खुपसून हत्या केली.
ही घटना पुण्याच्या कात्रजमध्ये जांभूळवाडी भागामध्ये घडली. जांभूळवाडी भागामध्ये दस्तगिर हे त्यांच्या कुटुंबासह राहतात. दस्तगीर यांचा मुलगा आणि मुलगी यांचे घरामध्ये काहीतरी किरकोळ कारणावरून वाद झाले होतं.
भावा बहिणीच्या नेहमीच्या भांडणासारखं हे भांडण होतं. त्यावर दस्तगिर यांनी त्यांच्या 13 वर्षाच्या मुलाला हाताने मारले. आता 13 वर्षाच्या मुलाला वडिलांनी मारणं ही तशी काही फार मोठी बाब नाही. मात्र दस्तगिर यांच्या मुलाला वडिलांनी मारणं सहन झालं नाही.
या संपूर्ण प्रकारामुळं त्याला राग आला आणि या रागात त्याने वडिलांना संपवले. दस्तगिर हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. कोरोनाच्या सध्याच्या संकटाच्या काळात सगळेच अनेक दिवस घरातच आहेत. त्यामुळं चिडचिडेपणा किंवा रागाचं प्रमाण वाढलेलं आहे.
तज्ज्ञांनी देखिल एकाच वातावरणात राहून अशाप्रकारे चिडचिडेपणा वाढणं शक्य असल्याचं मत व्यक्त केलं आहे. हा प्रकार तशाच चिडचिडीतून झाला आहे का? हे समोर आलेलं नाही. मात्र या काळामध्ये कुटुंबीयांबरोबर आपलं नातं अधिक दृढ करून यातून बाहेर निघणं म्हत्त्वाचं आहे.