इलेक्ट्रॉनिक मोटार काढताना 26 वर्षीय मजूरचा पाण्यात बुडून मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- शेतीतील इलेक्ट्रॉनिक मोटार काढताना एका मजूरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर सोनई पोलिस ठाण्याच्या समोर मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले.

ग्रामस्थांचा आक्रमकपणा पाहता पोलिसांनी संबंधित विहिर मालकांवर गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक माहिती अशी कि, घोडेगाव-जुना चांदा रस्त्याच्या शिवारात घोडेगाव येथील अशोक नहार यांच्या शेतातील विहिरीतील मोटार काढण्यासाठी शिवाजी एकनाथ सावंत (वय-२६)यास बोवले होते.

सावंत हा विहिरीत उतरला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सोनई पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. विहीर मालकाने मजुराची कुठलीही खबरदारी घेतली नव्हती. विहिर मालकावर गुन्हा दाखल केला तरच मृतदेह ताब्यात घेवू असे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले.

यावेळी नाथपंथी समाज संघटनेच्या वतीने पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यांनतर पोलिसांनी संबंधित विहिर मालकांवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24