भटक्या विमुक्तांच्या आरक्षणासाठी आरपीआय माध्यमातून मोठा लढा उभारणार -सुशांत म्हस्के

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- भटके विमुक्त समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. त्यांना खर्‍या अर्थाने विकासाच्या प्रवाहात आनण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही या घटकांना सामाजिक न्याय मिळू शकलेला नाही.

भटक्या विमुक्तांच्या आरक्षणासाठी आरपीआय गवई गटाच्या माध्यमातून मोठा लढा उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) पक्षात भटक्या विमुक्त समाजातील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम भंडारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.

यावेळी म्हस्के बोलत होते. सर्जेपुरा दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात भंडारी यांचे स्वागत करुन त्यांची आरपीआयच्या भटके विमुक्त आघाडीच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी आरपीआयचे शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नईम शेख, संतोष पाडळे, अल्पसंख्याक शहर प्रवक्ता जमीर इनामदार,

अल्पसंख्याक शहर कार्याध्यक्ष आजीम खान, अल्पसंख्याक शहरउपाध्यक्ष अरबाज शेख, उपनगर उपाध्यक्ष जावेद सय्यद, शहर संघटक बंटी बागवान, युवक शहर अध्यक्ष ऋषिकेश विधाते, विकी प्रभळकर, सोनू भंडारी, भिम वाघचौरे, अर्शद शेख, संजय साळी, सोनू गायकवाड, उमेश गायकवाड,

कार्तिक म्हस्के, आकाश भालेराव, मोनू गायकवाड, बिया कासार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तुकाराम भंडारी यांचे भटक्या विमुक्त समाजात सुरु असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची पक्षाच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली असल्याचे युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना तुकाराम भंडारी यांनी आरपीआयच्या माध्यमातून भटके विमुक्त समाजाला न्याय मिळणार आहे.

हा समाज विकासापासून वंचित असून, अनेक शासनस्तरावरील प्रश्‍न प्रलंबीत आहे. ते सोडविण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून कटिबध्द राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24