ताज्या बातम्या

पंकजा मुंडेंना शह देण्यासाठी भाजपकडून मोठी खेळी ! प्रसिद्ध उद्योगपती सुरेश कुंटेंना भाजपात घेत टाकला ‘डाव’

Published by
Ahmednagarlive24 Office

महाराष्ट्रातील राजकारण कधी नव्हे ते इतके ढवळून निघाले की कधी काय घेत हे सांगता येत नाही. सध्या भाजप आगामी लोकसभेसाठी ४५ प्लस जागांचे ध्येय राखून आहे. त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी पक्षातील नेत्यांची दिसते. त्यामुळे महाराष्ट्रात जेथे जेथे अडचणी वाटतात तेथे तेथे लगेच राजकीय गणिते बदलली जातात.

आता आणखी एक राजकीय बातमी आली आहे. प्रसिद्ध उद्योगपती सुरेश कुटे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. कापड दुकान, तिरुमला ऑईल, तिरुमला डेअरी, तिरुमला अॅग्रो आदींसारख्या कंपन्यांचा डोलारा असणाऱ्या व तब्बल १० हजारांवर कर्मचारी असणाऱ्या या बिझनेसच्या मालकाचे अर्थात उद्योगपती सुरेश कुटे यांचा नागपूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अत्यंत घाईत भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे आयटी विभागाने नुकतेच त्यांच्या कंपनीवर छापे टाकले होते. व हीच बाब आता राजकीय दृष्ट्या चर्चेची झाली आहे. यामागे भाजपची मोठी राजकीय खेळी असून पंकजा मुंडेंना शह देण्यासाठी भाजपकडून हा ‘प्लॅन B’ आहे असे म्हटले जात आहे.

 पंकजा मुंडेंचा अलीकडील काळात बदललेला सूर :-मागील काही दिवसांमध्ये भाजपमध्ये पंकजा मुंडे यांना विशेष राजकीय स्थान दिले जात नाहीये. तसेच त्यांचे महत्व भाजपमधून कमी करण्यात येत असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे पंकजा मुंडे या देखील नाराज होत्या. अलीकडील काळात त्यांचा सूर देखील बदललेला होता.

दसरा मेळाव्यातून त्यांनी भाजपवरच अप्रत्यक्ष टीका केली होती. तसेच भाजपतीलच त्यांचे जे विरोधक आहेत त्यांना तर त्यांनी थेट ‘त्रास देणाऱ्यांचे घर उन्हात बांधू’ असे खुले आवाहनच दिले होते. यामुळे आता पंकजा मुंडे यांना बीडमध्ये पर्याय हवा, तोही तगडा पर्याय हवा यासाठी भाजपने कुटे यांना भाजपात घेत पंकजा मुंडे यांना पर्याय निर्माण केला आहे असे भाजपमधीलच काही नेते बोलत आहेत.

राजकीय समीकरणे बदलणार, मुंडे भगिनींवर राजकीय वनवास येणार ? :-१७ हजार कोटी रुपयांचे नेटवर्थ असलेल्या द कुटे ग्रुपचे चेअरमन सुरेश कुटे आतापर्यंत राजकारणात कधी आले नाहीत. ते आजपर्यंत भरपूर लांब होते. परंतु आयटी विभागाची छापेमारी होते आणि अचानक ते भाजपमध्ये प्रवेश करतात हे राजकीय गणित आहे.

हे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने सक्षम पर्याय शोधल्याचे सध्यातरी बोलले जात आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्यातील भाजपमधील अनेक समीकरणे बदलतील. विशेष म्हणजे लोकसभेसाठी उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे आता कुटे यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस गट पंकजा मुंडेंच्या बीड जिल्ह्यात वेगळा सवतासुभा निर्माण करणार का? भाजापात मुंडे भगिनींवर राजकीय वनवास येणार का? अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत.

Ahmednagarlive24 Office