मोबाईल शॉपीवर चोरट्यांचा डल्ला; 33 लाखांचा माल केला लंपास

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-नगर जिल्ह्यात दरोड्खोरी, चोरी, घरफोडीचे घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यातच वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांबरोबरच व्यापारी देखील भयभीत झाले आहे.

नुकतेच चोरट्यांनी शहरातील टिळक रोडवरील मोबाईल शॉपीचे शटर उचकटून विविध कंपन्याचे मोबाईल, रोख रक्कम असा 33 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरा कोतवाली पोलीस ठाण्यात धीरज शिवाजी बारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील टिळक रोडवर फिर्यादी यांच्याकडे जीओ स्टोअर आहे. कंपनीच्या अधिपत्याखाली असलेल्या या मोबाईल शॉपीचे शटर उचकटून चोरट्यांनी 2 लाख 9 हजार रूपयांची रोकड,

महागडे मोबाईल असा 33 लाख 31 हजार रूपयांचा ऐवज लंपास करत पोबारा केला. चोरटयांनी जीओ कंपनी स्टोअर शेजारीच आणखी दोन मोबाईल शॉपी आहेत.

चोरट्यांनी जीओसह इतर दोन मोबाईल शॉपीच्या बाहेर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. त्यानंतर दुकानाचे शटर उचकटले. कॅमेर्‍याची वायरिंग तोडण्यापूर्वी चोरटे कारमधून आल्याचे दिसते.

कारमध्ये तिघे असून एक आतमध्येच बसला तर दोघे बाहेर येवून शटर तोडत असल्याचे दिसते आहे. शहरात वाढत्या चोरीच्या घटनामुळे शहर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24