अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. एकीकडे कोरोनाचा संकटाशी मुकाबला करत असताना जिल्ह्यातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
दरम्यान नुकतेच जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात एक धाडसी चोरी झाल्याचे उघड झाले आहे. शेवगाव येथील नाथ टायर्स दुकानाच्या शटर्सच्या पट्टया तोडून 11 लाख 10 हजार किमंतीचे टायर्स व टायर्सच्या टयुब यासह अन्य साहित्याची चोरी झाली आहे.
शनिवारी पहाटेच्या सुमारास शहरातील पाथर्डी रस्त्यावरील तहसिल कार्यालयासमोरील नाथ टायर्स या दुकानाचे प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
दुकानाचे मालक अभिजीत गर्जे राहणार निपाणी जळगाव (ता. पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरुन पोलीसांनी चोरट्यांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
गर्जे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, शुक्रवात रात्री आठच्या सुमारास नाथ टार्सचे दुकान बंद करुन गावी गेलो होतो.
शनिवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी गेलो असता दुकानाच्या शटरच्या लोखंडी पट्टया तुटलेल्या दिसल्या व शटर एक फुट वर केलेले दिसले.
तुटलेले शटर उघडून पाहिले असता दुकानातील टायर दिसले नाहीत. तर काही टायर अस्ताव्यस्त पडलेले व विखुरलेले दिसले. तसेच दुकानाच्या काऊंटरवर लावलेल्या सीसी टीव्हीच्या हार्डडिक्स ही दिसुन आली नाहीत.
कोणी तरी अज्ञात चोरटयांनी दुकानातील तब्बल 11 लाख 10 हजार रुपये किमंतीचा ऐवज चोरून नेला आहे. यावरुन गर्जे यांच्या फिर्यादीवरुन पोलीसांनी चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला.